कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील एसटीपी प्रकल्प चालविणे आणि देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. या निविदेच्या अटी शर्ती जाचक ठेवल्या असल्याने नव्या कंत्राटदाराना त्यात सहभाग घेता येणार नाही. ठराविक कंत्राटदार कंपन्याच त्यात सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे निविदेसाठी आवश्यक असलेली स्पर्धा निकोप होणार नाही. या विषयी सामाजिक कार्यकर्ते नितीन तरे यांनी सवाल उपस्थित केला आहे.
महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी साडे आठ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. महा ई टेंडरीद्वारे ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निविदा सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालविणे आणि देखभाल साठीची आहे. प्रशासनाकडून निविदेत टाकण्यात आलेल्या अटी शर्ती पाहता नव्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही. कामसााठी मागण्यात आलेला अनुभव आणि या पूर्वी कंत्राटदाराने कोट्यावधी रुपयांचे काम केले आहे का ? ही अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता कोणताही वाव ठेवलेला नाही. या अटी शर्ती शिथील करुन ही निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी. तर नव्या कंत्राटदाराना त्यात सहभाग घेता येईल. त्यामुळे निविदा भरताना होणारी स्पर्धा निकोप होऊ शकते. अन्यथा जुन्याच बड्या कंत्राटदाराना हे काम मिळू शकते. याकडे तरे यांनी लक्ष वेधले आहे.

