चर्चेची बातमी

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाच्या नगरसेविकांचा अनोखा निषेध,खड्ड्यांचीच शाल देत पालिका अधिकाऱ्यांचा केला ‘सत्कार’

कल्याण /प्रतिनिधी-कल्याण पश्चिमेतील पॅनल क्र.१२ मधील रस्त्यावर पडलेली खड्डे दुरुस्ती साठी वारंवार पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करूनही जाणिव पूर्वक दुर्लक्ष करीत ठोस कार्यवाही होत नसल्याने नगरसेविका स्वप्नाली केणे आणि अपर्णा भोईर यांनी पालिकेचे उपअभियंता रजपूत यांच्या कार्यालयात जाऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. व खड्डे पडलेल्या रस्त्यांचे प्रतीक असलेली शाल अधिकाऱ्यांना घालून करून त्यांचा ‘सत्कार’ करण्यात आला.

कल्याण पश्चिमेकडील पॅनल क्रमांक १२ मधील रामबाग परिसर, सिंडिकेट, कोकण वसाहत एकांडे चेंबर्स या भागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.या खड्डेमय रस्त्याच्या डागडुजी व दुरुस्ती साठी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार स्थानिक नगरसेविका स्वप्नाली केणे व नगरसेविका अपर्णा भोईर यांनी केल्यावर प्रशासनाने खड्ड्यांमध्ये खडी भरून देखाव्याची कामे केली.अल्पावधीतच रस्त्यांच्या खड्ड्यात भरलेली खडी रस्त्या वरून जाणाऱ्या वाहना मुळे खड्डा बाहेर अधिकच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते डांबरीकरण करून मिळावेत या मागणी नगरसेविका केणी व भोईर यांनी रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी कल्याण बांधकाम विभागाचे अभियंता भगतसिंग राठोड यांची भेट घेत त्यांना प्रतिकात्मक खड्डे पडलेली शाल घालून सत्कार करण्यात आला . तसेच रस्ते चांगल्या दर्जाचे झाले तर चांगली शाल आणून पुन्हा सत्कार करू, असा टोला देखील त्यांनी लगावला.गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महिला नगरसेविकांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »