डोंबिवली /प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली शहरात शिवसेना शिंदे गट,भाजपा,मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या लाख मोलाच्या दहीहंडीला फोडण्यासाठी
गोविंदा पथकांची चांगलीच रस्सीखेच झाली होती.यंदा गोविंद पथकाचा उत्साह कमी दिसून आला. अनेक गोविंदा पथकांनी दुचाकी, टेम्पो, मिनी बसचा आधार घेत दहीहंडीची ठिकाणे गाठली. त्यामुळे काही ठिकाणीच वाहतूक कोंडी झाली.डोंबिवली पूर्वे पश्चिमेतील महत्वाच्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दहीहंड्या मुळे या रस्त्यावरील वाहनाची वाहतूक रोखून ठेवण्यात आली होती.कल्याण पश्चिमे कडील शिवाजी चौक व शंकरराव चौकात वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला होता.
कल्याण डोंबिवली शहरा सह आजुबाजूच्या शहारा बरोबर ठाणे उपनगर व मुंबईतील दहा हंडी पथकाने बाळ गोपाळा सह शहरात धुमाकूळ घातला होता. डोंबिवली पूर्वे कडील बाजी प्रभू चौकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, डोंबिवली पश्चिमे कडील दिना दयाळ रोड येथे शिंदे सेनेचे नगरसेवक शैलेश धात्रक यांनी स्त्री पुरुष समान संधीची दहीहंडीची परंपरा कायम ठेवली. स्त्री पुरुष गोविंदा पथकाला प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले.
शिंदे सेनेचे नगरसेवक धात्रक यांच्या दहिहंडीत भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे पक्षा पलिकडचे ऋणानुबंध याठिकाणी पाहावयास मिळाले. कारण धात्रक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते. तर भोईर हे निवडणुकीपूर्वी मनसेत होते. ते भाजपमध्ये गेले.स्वराज्य दहीकाला महोत्सवचे माजी सभापती दीपेश म्हात्रे,यांनी लाख मोलाची दहीहंडी उभारून सांस्कृतिक ,नाच गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे दोन्ही दहीहंड्या डोंबिवलीकरांना आकर्षणाचा बिंदू ठरल्या होत्या.कल्याण ग्रामीणचे आमदार राजशे मोरे यांच्या वतीने दत्त नगर येथे दहीहंडीचे आयोजन केले होते या कार्यक्रमात दहा हंडी बघण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी लकी कूपन चे आयोजन करून विजेत्या महिलांना आकर्ष बक्षिसे देण्यात आली.मनसेचे जिल्हाध्यक्षमनसेच्या माजी नगरसेवक हर्षद पाटील यांनी उभारलेल्या लाखो रुपयाच्या पारितोषिकेच्या दहीहंडीला अनेक मंडळांनी हजेरी लावीत सलामी दिली तसेच लहान मुलासाठी बाळ श्रीकृष्णाची वेशभूषा करणाऱ्या लहान मुलांना पारितोषिक देऊन सन्मानित केले
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे सेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या दहीहंडीमुळे चौकात वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला होता. कारण एका बाजूला नेते पदाधिकारी यांची वाहने रस्त्यावरच उभी होती. दुसरीकडे पाण्याचा टँकर, क्रेन , मंडपाने रस्त्याची जागा अडवली होती.
ताेच प्रकार शंकरराव चौकात पाहावयास मिळाला. शंकरराव चौकात उद्धव सेनेच्या दहीहंडीमुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दूध नाका, पार नाका, टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागले.
कल्याण पूर्वेतील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात शिंदे सेनेची दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. मैदान रस्त्यालगत असले तरी त्याठिकाणी फारशी वाहतूक कोंडी झाली नाही.
सगळ्यात वरच्या थराला १४ वर्षापेक्षा जास्त लहान वयाची मुले चढवू नयेत असा नियम असताना हा नियम देखील अनेक गोविंद पथकांनी धाब्यावर बसविला.
प्रत्येक दहीहंडी आयोजकांनी दहिहंडीसाठी क्रेनचा वापर केला. त्याठिकाणी गोविंद पथकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली. सेफ्टी बेल्टचा वापर सगळीकडे करण्यात आला होता.
अनेक गोविंद पथकांना पाच, सात आणि ८ ते ९ थरांकरिता तीन, पाच, सात आणि ११ हजार रुपयांची बक्षिसे दिली गेली. त्यामुळे गोविंदा पथकांची सलामीत कमाई झाली. त्यामुळे अनेक हंड्या रात्री उशिरापर्यंत फुटल्या नव्हत्या.
कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या दहीहंड्यांच्या ठिकाणी डीजेचा मोठा दणदणाट होता. ज्यामुळे अनेकांच्या कानांच्या कानठळ्या बसत होत्या.आवाजाची डेसिबलची मर्यादे वर बंधनच नव्हते. पाेलिसांकडे आवाजाच्या प्रदूषणाचे डेसिबल मोजण्याचे यंत्र देण्यात आले असले तरी त्यांनी पोलिस डेसिबल मोजण्याचे यंत्र घेऊन फिरकताना दिसून आले नाही. पोलिस प्रशासनाकडे याची विचारणा केली असता त्यांनी सांगितले. मोजमाप सुरु आहे. मात्र कोणाची तक्रार आली तर आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत आवाजाच्या प्रदूषणाची मर्यादा दर्शविणारा रिअल टाईम ड’श बोर्ड लावण्यात आला आहे. महापालिकेच्या शेजारीच शंकरराव चौकात उद्धव सेनेच्या शहर शाखेची दहीहंडी उभारण्यात आली होती. त्याठिकाणी डिजेचा आवाज होता. मात्र त्यांच्या रिअल-टाइम आवाजाची मर्यादा महापालिकेच्या ड’श बोर्डवर ६७ डेसिबल दाखविण्यात आली होती. ड’शबोर्डमध्ये नोंदविण्यात आलेली मर्यादा आणि वास्तविक आवाजा यात तफावत आढळून आली. त्यामुळे लावण्यात आलेला डेश बोर्ड दररोज आवाजाची मर्यादा मर्यादित दाखवितो हे खरे असले तरी आजच्या दिवशीही त्यात फारसे बदल दिसून आले नाहीत.

