कल्याण /प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सिटी इंजिनियर अनिता परदेशी यांची नुकतीच नाशिक इथे बदली झाल्याने पालिकेच्या रिक्त झालेल्या सिटी इंजिनियर पदावर विराजमान होण्यासाठी पालिकेच्या अनेक कार्यकारी अभियंता असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे सेटिंग लावायला सुरुवात केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सिटी इंजिनिअर म्हणजेच शहर अभियंता हे पद गेल्या सात आठ वर्षा पूर्वी पालिकेतीलच कार्यकारी अभियंता पदोन्नतीने देण्यात येत होते मात्र काही वर्षा पासून शहर अभियता पदासाठी शासन नियुक्ती अधिकारी शासनाकडून पाठविण्यात येत असल्याने पालिकेच्या कार्यकारी अभियंता पदा पासून मुकावे लागत आहे.शासनाने पालिकेच्या माथी शासनाकडून शहर अभियंता पदी शासनाच्या अधिकाऱ्याची वर्णी लावत असल्याने पालिकेच्या अभियाता वर्गात नाराजगी पसरलेली आहे.त्यातच मागील साडे चार वर्ष प्रशासकीय राजवटी नंतर आठ महिन्यापूर्वी पालिकेच्या निवडणुका पार पडून लोकप्रतिनिधी राजवट आल्याने शासनाकडून पालिकेतील सर्वच महत्वाच्या पदावर नेमणुका केल्या जाणाऱ्या शासन नियुक्त अधिकाऱ्याच्या वर्णिला महासभा आता तरी चाप देईल का अशी चर्चा पालिका वर्तुळात पसरली आहे.पालिकेच्या शासन नियुक्त शहरअभियता अनिता परदेशी यांचा पालिकेतील कार्यकाळ संपल्याने त्याची शुक्रवारी नाशिक येथे शासनाने बदली केल्याने त्यांनी पालिकेतील पदभार सोडला असल्याने पालिकेत रिक्त झालेल्या शहर अभियंता पदासाठी आपली वर्णी लागण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याकडे सेटिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतील बहुचर्चित तसेच वादग्रस्त असलेल मात्तब्बर अभियता असलेल्या सुरेंद्र टेंगळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.पालिकेच्या नगर रचना विभागात अनेक वर्ष काम केल्याचा अनुभव असल्याने त्याचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याशी सलोख्याचे संबंध आहेत. तसेच अनेक प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत.तर दुसरीकडे पालिकेच्या सेवा ज्येष्ठते नुसार कार्यकारी अभियता शैलश कुलकर्णी यांनी ही पालिकेतील विविध विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केल्याने शैलेश कुलकर्णी यांची ही शहर अभियंता पदी वर्णी लागण्यासाठी दावेदार आहेत.सद्यस्थितीला पालिकेच्या आयुक्त पदापासून अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त,सहाय्यक आयुक्त,सहा.संचालक नगर रचनाकार आदी महत्वाच्या पदावर शासन नियुक्ती अधिकाऱ्याची वर्णी लावल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही पदे मिळणार तरी कधी या आशेवर पालिकेतील अधिकारी कर्मचारी डोळे लावून बसले आहेत.

