truenewsmarathi.
कल्याण/प्रतिनिधी _डोंबिवली पश्चिम कडील भागात पाणी पुरवठा व्यवस्थेतील पाणी वितरणातील दोषा मुळे गेल्या अनेक महिन्या पासून नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा गंभीर प्रश्न स्थायी समितीच्या सभेत भाजपाचे स्थायी समिती सदस्य नंदू म्हात्रे यांनी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.पाणी पुरवठा विभागाच्या सदरची बाब निदर्शनास आणून देऊनही प्रशासन दुलक्ष करीत असल्याने नागरिकांना आम्ही लोकप्रतिनिधीने कसे काय तोंड द्यायचे असा प्रश्न उपस्थित करीत चांगलेच धारेवर धरले.अखेरीस पाणी टंचाईच्या या गंभीर प्रश्न निकाली काढण्यासाठी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची स्थायी समिती दालनात बैठक आयोजित करण्याचे स्थायी समिती सभापतींनी सभागृहाला निर्देश देण्यात आले .
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागातील डोंबिवली पश्चिमेकडील ह प्रभाग कार्यालयातील काही प्रभागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्या पासून पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील दोषा मुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना भेडसावणारा गंभीर प्रश्न स्थायी समिती सदस्य भाजपाचे नगर सेवक नंदू म्हात्रे व शिवसेना गटाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करून वाचा फोडली. प्रभागातील नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई प्रश्नी म्हात्रे यांनी मागील अनेक स्थायी समितीच्या सभेत प्रश्न उपस्थित केला होता.पाणी टंचाई बाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार व पाठपुरावा करूनही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दुलक्ष करीत असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.डोंबिवली पश्चिमे कडील काही प्रभागात पालिकेच्या मधूबन जलकुंभातून नागरिकांना पाणी पुरवठा वितरित केले जाते. पाणी किती प्रेशरने पुरवठा होतो याची नोंद ठेवणारा फ्लो मीटर लावण्यात आला आहे. या फ्लो मीटरमध्ये दाखविण्यात येणारा प्रेशर हा १९५, २००, २०५ या नुसार आहे. पाणी प्रेशर पुरवठा होत असताना पाणी कमी का मिळते ? याची विचारणी देखील सदस्यांनी पाणी खात्याच्या अभियंत्याकडे केली. त्यांनी सदस्यांनी दिलेली उत्तरे थातुरमातुर होती. त्यामुळे अखेरीस सदस्यांनी या प्रश्नाला समितीच्या बैठकीत वाचा फोडली. या बैठकीत अभियंत्यांना ठोस उत्तरे देता आली नाही. अशीच परिस्थिती डोंबिवली पूर्वेकडील
रघूवीर नगर परिसरात १४ लाख रुपये खर्च करुन ६ इंची जलवाहिनी आत्ताच नव्याने टाकण्यात आली आहे. तरीही रघूवीरनगर मध्येही पाणी पुरवठा कमी प्रेशर ने केला जात असल्याची माहिती अन्य स्थायी समिती सदस्यांनी निदर्शनास आणून दिली .काही ठिकाणी १५ ते २० मिनिटे तर काही ठिकाणी पाणी येते. ते देखील अत्यंत कमी दाबाने येते. तर काही ठिकाणी २५ ते ३० मिनिटेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.डोंबिवली शहराला नेतिवली जलशुद्धी करण केंद्रातून १५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो .नेतिवली जलशुद्धी करण केंद्रातून प्रेशरने पाणी पुरवठा होत असताना पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील दोषा मुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे काही ठिकाणी पाणी पुरवठा वितरण करताना वॉलमन कमी जास्त प्रमाणात पाणी पुरवठा करण्याची चलाखी करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.या गंभीर प्रश्नाची दाखल घेत स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी येत्या दोन दिवसात स्थायी समिती दालनांत संबधित पाणी पुरवठा विभागाच्या अभियंताची बैठक बोलावून पाणी टंचाई प्रश्ना बाबत अडचणी सोडवून पाणी प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश सभागृहाला या वेळी देण्यात आले. त्यामुळे डोंबिवली पश्चिम कडील नागरिकांची पाणी टंचाईतून सुटका होणार तरी कधी असा प्रश्न आवासून उभा राहिला आहे.

