ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीतील प्रलंबित बिलांच्या देयका साठी पालिका मुख्यालयावर ठेकेदार संघटनेचे आंदोलन

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी -कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात विविध विकास कामे केली जातात .कोट्यवधी रुपयाच्या खर्चातून केल्या जाणाऱ्या कामाची सुमारे २०० कोटी रुपयांची बिले गेल्या तीन वर्षा पासून अडकून पडली आहे कामे पूर्ण झाली असतानाही ठेकेदाराना अद्याप पर्यंत बिले मिळत नसल्याने त्याच्यावर उपास मारीची वेळ आल्याने प्रलंबित बिलाची देयके त्वरित अदा करण्याच्या मागणीसाठी पालिकेतील ठेकेदारांच्या संघटनेच्या वतीने पालिका मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले.
महापालिकेतील विकास कामाची प्रलंबित बिलांची देयके मिळावे या मागणी करीता पालिकेतील ठेकेदारांच्या संघटनेच्या वतीने आंदोलन केले होते .या आंदोलनात संघटनेचे
विजय भोसले,कालिदास कदम, विलास बागड,रवी हराळे,राजू भाटी, संजय देवरे,दर्शन देशमुख, देविदास घरत,गणेश पाटील आदी पदाधिकारी तसेच पालिकेत विकास कामे करणारे सर्वच ठेकेदार सहभागी झाले होते.
पूर्ण केल्या नंतरही बिले अदा न झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांकडे काम करणारे कामगार तसेच साहित्य पुरवठा करणारे सप्लायर पैशांसाठी सतत तगादा लावत आहेत. त्यामुळे ठेकेदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, अनेकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
“आम्ही सरकारची आणि महापालिकेची कामे केली आहेत. आमच्या मेहनतीचे पैसे सरकारने आम्हाला द्यावेत,” अशी मागणी ठेकेदारांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून देणी रखडल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने आणि महापालिका प्रशासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
ठेकेदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० ते १५० ठेकेदारांची तब्बल २०० कोटी रुपयांची देणी सरकारकडे,महापालिकेकडे थकीत आहेत. या थकीत रकमेमुळे ठेकेदारांना कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण झाले आहे.
यावेळी आंदोलकांनी असा गंभीर आरोपही केला की, आर्थिक देणी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे काही ठेकेदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठेकेदारांची थकीत देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, थकीत बिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »