True news marathi online.
कल्याण – डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्तीचे दात विकण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी अटक करून १० लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.आकाश पवार (२८) आणि नितीन धामणे (२६) अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे असून ते डोंबिवलीतील दावडी गावचे रहिवासी आहेत.
मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी विजय कडबाने यांनी सांगितले की, काही लोक हस्तिदंताची तस्करी करून त्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडा यांच्या पथकाने तुकाराम चौकाजवळ सापळा रचून दोन्ही तस्करांना अटक केली. झडतीदरम्यान या तस्करांकडून हत्तीचे दोन तुकडे जप्त करण्यात आले. पोलिसांनी तस्करांच्या दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त केले असून, त्याची किंमत १० लाख ६० हजार रुपये आहे. मानपाडा पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सचिन साळवी करत आहेत.

