TRUE NEWS MARATHI
कल्याण/प्रतिनिधी – बांगलादेशी रोहिंग्यानी भारतात घुसखोरी केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे . त्यांच्याकडे बोगस जन्म प्रमाणपत्र देखील आढळून आले.याबाबत जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात करण्यात आलेल्या अर्जां बाबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवार 29 तारखेला कल्याण मध्ये आले होते . यावेळी बोलताना कल्याण तहसील कार्यालयाकडून साडेबाराशे मधून जवळपास साडेसहाशे अर्ज बाद करण्यात आल्याचे तहसीलदाराने सांगितले . यावेळी किरीट सोमय्या यांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र देताना सर्व प्रकाराची चौकशी करून अर्ज स्वीकारा अशी सूचना तहसील विभागाला केली आहे

