True news marathi online.
नवी मुंबई – नवी मुंबईच्या खाडीकिनारी फ्लेमिंगो पक्षांचे दर्शन घडत आहे. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील चाण्यक्य पॉइंट खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. त्यामुळे खाडी किनारा अशा फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगाने न्हाऊन गेला आहे.
हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत आहेत. या पक्ष्यांचं रूप आणि सौंदर्य न्याहाळण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे. तसेच नवी मुंबईतील लहान मोठ्या पाणथळ जागांवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

