खेळ ट्रेंडिंग न्यूज

सम्राट अशोक शाळेची विद्यार्थिनी श्रिया विरणकची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

TRUE NEWS ONLINE
कल्याण – कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा १४ वर्षा खालील मुलींचा संघ उपविजेता ठरला. राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार असून महाराष्ट्राच्या संघात कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयाची इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी श्रिया संदीप विरणक या विद्यार्थिनीची महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे.

संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्यासह शिक्षकांनी श्रिया व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.श्रिया व मार्गदर्शक शिक्षक रामदास बोराडे यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »