TRUE NEWS MARATHI
संभाजीनगर प्रतिनिधी – एसटी महामंडळाने 15% भाडे वाढ केली आहे त्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

