TRUE NEWS MARATHI.
डोंबिवली/प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल मैदानात डोंबिवली ऑलिम्पिक मध्ये डोंबिवलीतील 80 शाळांनी भाग घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी प्रमुख तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलीत करण्यात आले.यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह प्रमुख पाहुणे रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट अध्यक्ष माधव शिंग,प्रोजेक्ट डायरेक्टर राजन सावरे,प्रोजेक्ट चेअरमन योगेश पोरे, चंद्रशेखर शिंदे,राकेश मेहता,आनंद फेबळी, डॉ.उल्हास कोल्हटकर, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर म्हणाले, मैदानी खेळ करता आपण सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

डोंबिवली मैदान कमी आहेत ही वास्तविकता नाकारता येत नाही. इतर देशात मैदान हे फक्त खेळांसाठी राखीव असतात.त्याचप्रमाणे येथेही मैदान हे लग्न व समारंभ याकरता देऊ नये.पुढे अध्यक्ष माधव सिंग म्हणाले, विद्यार्थ्याना शालेय शिक्षणाबरोबर मैदान खेळ व इतर खेळांचमध्ये पुढे आणण्यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व नेहमी प्रयत्न करत असते. गेल्या 30 वर्षापासून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ही स्पर्धा भरवीत आहे.1995 साली डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या संकल्पनेतून हि स्पर्धा सुरु झाली.या स्पर्धेत 2700 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. याचा मुख्य उद्देश असा आहे की, विद्यार्थ्यांचाशिक्षणाबरोबर सर्वांगिण विकास व्हावा आणि अशा स्पर्धामुळे डोंबिवलीतील खेळाडू हा अंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले नाव उंचावेल.

