TRUE NEWS MARATHI
डोंबिवली/प्रतिनिधी – साधना आधार वृद्ध सेवा केंद्रात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, साधना आधार वृद्ध सेवा केंद्र संचालिका सुमेधा थत्ते, समाजसेवक भाई पानवडीकर, कैलास सणस, मनसे पदाधिकारी रोहन म्हात्रे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वेष परिधान केला होता. तर लहान मुली भारतमाता व झाशीची राणी बनल्या होत्या.

