TRUE NEWS MARATHI
नवी मुंबई/ प्रतिनिधी – अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ॲक्शन मोडवर आले आहेत. बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत
शहरात झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये बांगलादेशींना आश्रय मिळत असल्याचे चित्र पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे. बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड वापरले जाते. तसेच महिनाभरामध्ये 125 जणांना अटक करण्यात आली तसेच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कागदपत्र बनावट आढळून आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहेत. आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती मिलिंद भारंबे, नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी दिली.

