TRUE NEWS ONLINE
अंबरनाथ – अंबरनाथमध्ये गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत.अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनी परिसरात एक तरुण बंदूक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथमेश सुधाकर लोंढे या १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडे सापडलेलं गावठी पिस्तुल हे त्याने नाशिकहून विकण्यासाठी आणले होते. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

