TRUE NEWS ONLINE
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नागरिकांचे ज्वलंत प्रश्न नागरी समस्या साठी आजपासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेऊन केडीएमसी प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी शिष्टमंडळालi चर्चे साठी आज आमंत्रित केले होते.
या अनुषंगाने शिष्ठ मंडळाने दिलेल्या निवेदनावर व मांडलेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मांडलेल्या अनेक नागरी समस्यातील त्यातल्या काही ज्वलंत प्रमुख मुद्यावर त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्णय घेण्यात आले. कल्याण (प.) बाजार परिसर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक व कल्याण रेल्वे स्टेशन परिसर या व इतर ठिकाणी गरज असल्या प्रमाणे त्वरीत महिला व पुरुषiसाठी कंटेनर टॉयलेट (मुतारी) उभारण्यात यावे.
रुक्मिणी बाई रुग्णालयातील काही भागाचे खाजगी करण केल्या मुळे नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधाची मोठ्या प्रमाणात गैर सोय निर्माण झाली आहे. हे रुग्णालय राज्य शासनाला सुपूर्त करून त्याला उपाजिल्हा मध्यवर्ती ‘रुग्णालय बनविण्यासाठी शिफारस करावी म्हणजे नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्या साठी मदतच होईल. पालिकेच्या नियमांना बगल देऊन काही (बिल्डर) व्यावसायिक विकासक लोक कायाद्याचे पायमल्ली करून मोठ मोठ्या इमारती उभ्या करतात त्यातून सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, असे काही उदहारण शिष्टमंडळाने आयुक्तांच्या समोर ठेवले.
या ज्वलंत प्रश्नावर अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी या महत्वाच्या विषयवार संबंधित अधीकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या मुळे आज होणाऱ्या जन आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उर्वरीत प्रश्नांवरही, समाधानकारक रित्या चर्चा झाली असुन अतिरिक्त आयुक्त गोडसे यानीं सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी महापालिका प्रशासनाला भेटण्यासाठी गेलेल्या शिष्ठ मंडळात राष्ट्रवादीचे नोवेल साळवे, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संतोष रोकडे, आम आदमी पार्टीचे राजू पांडे, दी इंडियन ख्रिश्चन असोसिएशनचे प्रवीण गुंजाळ उपस्थित होते.

