कृषी चर्चेची बातमी

फळगळतीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी हवालदिल

True news marathi online.

जालना– जालना जिल्हा हा जसा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो मोसंबी उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे मात्र, सध्या हा मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मोसंबी फळ लागवडीकडे वाटचाल केली आहे मात्र यावर्षी मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोसंबीच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

मोसंबीच्या बागेत जिकडेतिकडे फक्त मोसंबीचे फळे पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर फळ गळती थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी खर्च करुन महागडी औषध फवारणी, महागडे खते टाकली तरी काही फायदा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच मोसंबी विक्रीसाठी मार्केटमध्ये नेले असता योग्य भाव देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून लागवड खर्चही निघत नसल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या शेतकऱ्यांना तारण्याचे काम करावे कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल त्यामुळे त्यांनी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी व मोसंबीला योग्य तो भाव द्यावा अशी मागणी जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »