True news marathi online.
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकामध्ये सध्या 69 बस कार्यरत असून त्यापैकी 4 शिवशाही बस आहेत आणि या 69 बस द्वारे गोंदिया आगारातील कारभार सुरू आहे. दर दिवशीच्या गोंदिया जिल्ह्यातील बस आगाराचे उत्पन्न 6 ते 7 लाख रुपये असून गेल्या आर्थिक वर्षामध्ये गोंदिया आगाराला फायदा झाला असून जवळपास 2 कोटी रुपयांचा नफा गोंदिया आगाराने कमावला आहे.
गोंदिया आगारात सध्या एकूण 69 बस पैकी 4 शिवशाही बस कार्यरत असून 2025 मध्ये 12 बस या निकामी होणार आहेत तर 10 नवीन बसेस गोंदिया आगाराला मिळणार आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील बस स्थानकाच्या आगारांमध्ये अजून नवीन बसेसची मागणी होत आहे.

