TRUE NEWS MARATHI
कल्याण/प्रतिनिधी :- अविष्कार कल्पकतेकडून कृतीकडे या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी नूतन विद्यालयात संपन्न झाली .कल्याणातील छत्रपती शिक्षण मंडळ आयोजित आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी नूतन विद्यालय ,कर्णिक रोड,कल्याण येथे नुकतीच पार पडली.या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती, जिल्हादायित्व विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा महाराष्ट्र संयोजक सुभाष पाटील तसेच छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष मा. ना. के फडके कार्याध्यक्ष श्रीकांतजी तरटे सरचिटणीस डॉ. निलेशजी रेवगडे आणि संस्थेतील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण २१ शाळांनी सहभाग घेऊन ४२ प्रकल्प व १०३ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून नरेंद्र गोळे, सुमन नायर, मोमीन सादिया अंजुम जावेद अहमद,गोपा घोष यांनी परीक्षण केले.विद्यार्थ्यांनी प्रयोगाची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडली होती. इ. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक गटांमध्ये तीन क्रमांक काढण्यात आले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्पिता कानेटकर यांनी केले. संस्थेच्या एन.सी.पी समन्वयकउर्मिला जाधव तसेच उपप्रमुख जहिरा तडवी यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. आभार प्रदर्शनश्री. संजय मंजुळे यांनी केले. सुंदर फलक लेखन श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून साकारले.कार्यक्रमाचे वृत्तलेखन प्रसारमाध्यमांनासौ.शुभांगी भोसले यांनी प्रसारित केले
निकाल पुढीलप्रमाणे :-
इ. 6 वी
प्रथम
स्मार्ट सिटी (विवेकानंद संकुल, प्राथमिक इंग्रजी माध्य.)
द्वितीय
मल्टीटास्किंग सोलर स्टेशन
(नूतन ज्ञानमंदिर, कल्याण)
तृतीय
अपारंपारिक
ऊर्जानिर्मिती
(विवेकानंद संकुल सानपाडा,प्राथमिक मराठी माध्य.)
उत्तेजनार्थ हायड्रोपॉवर (विद्यामंदिर मांडा टिटवाळा )
इ. 7 वी
प्रथम –
स्मार्ट ग्लासेस फॉर ब्लाइंड पीपल
( विवेकानंद संकुल सानपाडा,इंग्रजी माध्यम )
द्वितीय
औषधी वनस्पतींचे उपयोग
(सरस्वती विद्यामंदिर सायले )
तृतीय
स्मार्ट सिटी
(विद्यामंदिर,
मांडा -टिटवाळा)
उत्तेजनार्थ
औषधी वनस्पती (जनता विद्यालय प्रशाला, दहिवली )
इ. 8 वी
प्रथम
गाड्यांच्या
धुरापासून शाई निर्मिती
(विक्रमगड हायस्कूल विक्रमगड )
द्वितीय
ग्रीन सोलर सिटी (माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा)
तृतीय
कार्बन प्युरिफिकेशन (विद्यामंदिर मांडा टिटवाळा)
उत्तेजनार्थ
स्मार्ट लगेज ट्रॅव्हलर (नूतन ज्ञानमंदिर कल्याण)
इ. 9 वी
प्रथम
इलेक्ट्रिसिटी फ्रॉम गार्बेज
(नवजीवन विद्यालय कल्याण)
द्वितीय
विभागून
आत्मनिर्भर गाव (नूतन विद्यालय कल्याण)
औषधी वनस्पतींचे उपयोग
(जनता विद्यालय,
धसई )
तृतीय
पुनर्वापर व
पुनचक्रीकरण
अभिनव ज्ञानमंदिर ऊसर,खुर्द
उत्तेजनार्थ
औषधी वनस्पतींचे उपयोग
(विद्यामंदिर मांडा टिटवाळा

