TRUE NEWS ONLINE
कल्याण– कल्याण पश्चिमे कडील वायले नगर परिसरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक कला प्रदर्शन भरविण्यात आले होते .विविध प्रांतातील कला,संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नृत्य परंपरा अशा विविधतेने नटलेल्या या प्रदर्शनाला शेकडो विद्यार्थी वर्गासह पालकांनी उपस्थित राहून उत्फुर्तेपने प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन उपक्रमशील कलाशिक्षक आंतरराष्ट्रीय रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी भोसे शालेय प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. भारतातील विविध प्रांतातील कला,संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नृत्य परंपरा अशा विविधतेने नटलेल्या या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. या प्रदर्शनात एकूण ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली. याप्रसंगी उद्घाटक श्रीहरी पवळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले अशा वैशिष्ट्यपूर्ण कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक आणि इतर शिक्षकांचे कौतुक केले कलाशिक्षिका अमृता रत्नपारखी सुवर्णा शिरसाट आणि इतर सहकारी सर्व शिक्षकांनी प्रदर्शनासाठी खूप परिश्रम घेतले . शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी भोसे मॅडम यांनी श्रीहरी पवळे यांचा सन्मान करून आभार मानले
ताज्या घडामोडी
शिक्षण
कल्याण मध्ये वार्षिक कला प्रदर्शनाला उत्फुर्ते प्रतिसाद
- January 21, 2025
- by true news
- 0 Comments
- 41 Views

