TRUE NEWS MARATHI
कल्याण/प्रतिनिधी -केडीएमसी मुख्यालय मध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेमध्ये चर्चेत असणाऱ्या सुरक्षा रक्षक सरिता चरेगावकर यांचा सर्व्हिस बुकातिल दस्त गायब झाल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे . सुरक्षा रक्षक रमेश पौळकर यांना माहिती मागितली असता सामान्य प्रशासनातील अधिकारी वंदना गुळवे यांनी दस्त गायब झाल्याचे परिपत्रक काढले आहे .
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत कालकथित शंकर दत्तात्रय चरेगावकर, सुरक्षा रक्षक, कडोंमपा यांचे मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर अनुकंपाने नोकरी मिळविण्यासाठी श्रीमती सरिता शंकर चरेगावकर, सुरक्षा रक्षक यांनी कडोंमपा प्रशासनाकडे दिलेल्या अर्जासह सदर अर्जासोबत जोडलेल्या संपुर्ण दस्तऐवजांची माहिती, माहिती अधिकार अर्जान्वये रमेश जी. पौळकर यांनी अपेक्षीलेली आहे. त्याअनुषंगाने इकडील कार्यालयात उपलब्ध दस्तऐवजांचा शोध घेतला असता सदर नस्ती आढळून आलेली नाही. तसेच रेकॉर्ड विभागास पत्र देवून विचारणा केली असता रेकॉर्ड विभागातही नस्त आढळून आली नाही.
दरम्यान आपणास या परिपत्रकाने आवाहन करण्यात येते की, सदरची नस्ती अनावधनाने आपल्या खाते/विभाग / प्रभाग येथे आली असल्यास सदर नस्तीचा तातडीने शोध घेवून सहकार्य करावे. नस्ती आढळून आल्यास तात्काळ इकडील कार्यालयात पोहोच करावी. म्हणजेच अर्जदारास लवकरात लवकर माहिती पुरविता येईल.असे परिपत्रक वंदना गुळवे उप आयुक्त (सा.प्र.)यांनी काढले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची महत्त्वाची माहिती कार्यालयातून गहाळ होणे
के प्रशासनाचे निष्काळजीपणाने लक्षण आहे.

