TRUE NEWS ONLINE
कल्याण – दिवाळी होऊन दोन महीने उलटले तरी देखील अद्यापही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ७०० आशा वर्कर्सना दिवाळी बोनस पासून वंचित ठेवले असून हा दिवाळी बोनस देण्या सह इतर मागण्या मान्य करण्याच्या मागन्याचे निवेदन आशा वर्कर्स यांच्या युनियनच्या वतीने केडीएमसी आयुक्तांना दिले .
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील आशा वर्कर्स ना आपल्या विविध मागण्यासाठी वणवण कराण्याची वेळ आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात गेली १५ ते १६ वर्षो पासून आशा वर्कर्स म्हणून काम करीत असलेल्या आशा वर्कर्स तसेच नव्याने घेतलेल्या अशा एकंदरीत ७२० आशा वर्कर्सना अद्याप देखील नियुक्ती पत्र मिळाले नाहीत. लगतच्या पालघर जिल्ह्यातील आशा वर्कर्स ना नियुक्त पत्र मिळते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आशा वर्कर्सना मिळत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो अशी खंत ठाणे -पालघर जिल्हा आशा व गट प्रवर्तक युनियन सचिव काँ गीता माने यांनी व्यक्त केली आहे.
आशा वर्कर्स महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच शासनाचे आरोग्य विषयक सर्वे, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी साठी माध्यम म्हणून कार्यरत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी महत्वाची भुमिका निभावली होती. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे सर्व आशांना जाहीर केलेला 5 हजार दिवाळी बोनस त्वरीत मिळावा. आशांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे नियुक्तीपत्र मिळाली पाहीजे. महानगरपालिका अंतर्गत काम करणा-या आशा कर्मचा-यांना इतर महानगर पालिकांप्रमाणे ठोक मानधनावर सामावून घ्यावे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने आशा वर्करच्या कामाची वेळ व कामाचा प्रकार ठरवून दिला पाहिजे. आरोग्य विभागाशी संबंधीत नसणारी कामे करण्यास भाग पाडणे व सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजे पर्यंत काम नसताना प्राथमिक आरोग्य केंद्रांवर थांबवून ठेवणे हे प्रकार बंद झाले पाहीजे. या आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवदेन देण्यात आले. या प्रसंगी ऊबर्डे, मांडा,मोहने, आंबिवली, टिटवाळा, चिकणघर, आधारवाडी, गोदरेज हिल आदि परिसरात कार्यरत असणार्या आशा वर्कर्स एकत्र जमल्या होत्या.
कल्याण
ताज्या घडामोडी
केडीएमसी क्षेत्रातील आशा वर्कर्स दिवाळी बोनसपासून अद्यापही वंचित
- January 13, 2025
- by true news
- 0 Comments
- 58 Views

