TRUE NEWS MARATHI.
कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवलीतील एका तेरा मजल्याच्या इमारती मधील तिसऱ्या मजल्या माळया वरील घरातील बालकनीतून दोन वर्षाचा चिमुरडा खाली पडत असताना तरुणाने चित्रपटातील दृश्या प्रमाणे धावत जाऊन झेलन्याचा प्रयत्न केला असताना चिमुरडा हातातून निसटून जमिनीवर पायावर पडल्याने किरकोळ मार लागल्याने चिमुरड्याचा तरुणाने जीव वाचाविल्याची घटना डोंबिवलीत घडली.
शनिवारी २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजुन ४९ मिनिटांच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील अनुराज हाईट्स टॉवर,गावदेवी मंदिर जवळ,देवीचापाडा येथिल १३ माळ्याच्या बिल्डिंग मधून भावेश एकनाथ म्हात्रे हा तरुण त्याच्या सहकार्यान सोबत बाहेर पडत असताना दोन वर्षाचा चिमूरडा खेळता खेळता तिसऱ्या माळ्याच्या बालकानीतून दुसऱ्या मजल्या वरील तुमच्या पत्र्यावर घरून जात खाली जमिनीवर पडत असल्याचे दिसता क्षणी भावेश ह्याने जिवाची पर्वा न करता धावत जाऊन त्या चिमूरड्याला झेलण्याचा प्रयत्न केला असता चिमूरडा त्याच्या हातातून निसटून पायावर पडला आणि त्याचे जीव वाचले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सोसायटीच्या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्या मध्ये रेकॉर्ड झाले आहे .भावेश या तरुणाच्या कर्तव्यदक्षते
दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जीव वाचल्याने देव तारी त्याला कोण मारी या म्हण साक्षात दिसून आल्याने भावेशचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

