चर्चेची बातमी ठाणे

सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीच्या वतीने डोंबिवलीत हळदीकुंकू समारंभ

TRUE NEWS MARATHI

डोंबिवली/प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीच्या डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीचे डोंबिवली पश्चिमचे संस्थापक विद्याधर दळवी म्हणाले, डोंबिवली विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आमचे मंडळ गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य व उपक्रम करत आहोत.हळदी कुंकू समारंभ, गौरी गणपती सणाला कोकण जाण्यासाठी एसटीची सोय, आरोग्य शिबीर अशी उपक्रम सुरु असतात. त्याचाच एका भाग म्हणून मंडळाच्या वतीने प्रथमच डोंबिवली पश्चिमेला उमेशनगर येथे हळदीकुंकू समारंभ आयोजित केला.मंडळाचे अध्यक्ष अनंत परब ,मनोज सावंत, कोरेकर, आंजनवाडकर,गावडे,मनोज आंग्रे यांसह अनेक कार्यकर्ते अथक मेहनत घेत असतात. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सीताराम कदम, सकपाळ , विजय गावकर,वर्षा दळवी, ऋतुजा चव्हाण, गौरी गावकर याचेही मंडळाला सहकार्य मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »