TRUE NEWS MARATHI
नंदुरबार/प्रतिनिधी – राज्य परिवहन विभागाने एसटीची शनिवारपासून भाडेवाढ केली असून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. डोकेदुखी वाढणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने 14.95% एवढी भाडेवाढ लागू केली असून शनिवार पासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.अनेक प्रवाशांना भाडेवाढ लागू झाल्याची माहिती देखील नसल्याचे चित्र आहे. यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये भाडेवाढ संदर्भात तू तू मे मे पाहायला मिळत आहे.
आता नंदुरबार हुन धुळेसाठी 162 रुपये, नाशिक साठी 378, छत्रपती संभाजीनगर साठी 428, पुण्यासाठी 750 एवढी तर महाराष्ट्रातून गुजरात व मध्य प्रदेश येथे जाणाऱ्या नंदुरबार डेपोच्या गाड्यांमध्ये ही भाडे वाढ करण्यात आली आहे. पाच वर्षापासून महामंडळाने कुठल्याच प्रकारची भाडेवाढ केली नव्हती त्यातच एसटी साठी लागणारे साहित्य, कर्मचाऱ्यांचा पगार याचा अतिरिक्त बोझा महामंडळावर पडत असल्याने ही भाडेवाढ केली असावी असे आगार प्रमुख संदीप निकम यांनी सांगितले. दरम्यान भाडेवाढ करताना पूर्वीच्या कुठल्याही सवलतींना धक्का लावण्यात आला नसून सवलती तसेच सुरू राहणार असे सांगण्यात आले…

