कल्याण ताज्या घडामोडी

जगन्नाथ आप्पा शिंदे अमृत पर्व नियोजन समिती, कल्याण पूर्व आयोजित अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा

TRUE NEWS MARATHI

कल्याण– कल्याण शहरात सर्व सामाजिक संस्थांच्या वतीने आप्पांचा जीवनपट उलगडवणारी प्रकट मुलाखत सप्तकन्या मंगल कार्यालय कल्याण पूर्व येथे होणार आहे. या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरातून आप्पांच्या वाढदिवसानिमित्त 29 जानेवारी रोजीसायंकाळी पाच वाजता कल्याण पूर्वेकडील पोटे मैदान जिम्मीबाग येथे आप्पांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा, जगन्नाथ आप्पा शिंदे अमृत पर्व नागरी सत्कार सोहळा नियोजन समिती कल्याण पूर्वच्यावतीने आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे,भाजपा प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, हसन मुश्रीफ, आमदार दादा भुसे, आमदार प्रकाश आंबेडकर, खासदार बाळ्या मामा म्हात्रे, समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व स्वागत अध्यक्ष आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, माजी विधान परिषद आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशात विविध स्तरातून मोठया प्रमाणात साजरा होत आहे.त्यानिमित्त संपूर्ण भारत देशात २४ जानेवारी रोजी रक्तदान संकलन व प्रतिज्ञा सोहळा झाला. त्यामधे ७५ हजार पेक्षा अधिक रक्त दात्यांनी आपला सहभाग नोंदवून आप्पांना ७५ वा वाढदिवसाची भेट दिली.पुणे जिल्हा केमिस्ट ७५ असोसिएशनने महालक्ष्मी लॉन्स कोथरूड पुणे येथे 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता.उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे पाच हजार जनसमुदायाच्या साक्षीने 55 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. प्रत्येक जोडप्याला एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची नथ चांदीची जोडवी संसार उपयोगी लागणारी सर्व भांडी वधू-वरांना तीन-तीन पोशाख देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »