खेळ चर्चेची बातमी

क्षितिज गतिमंद शाळेतील विद्यार्थीहि शिक्षणाबरोबर खेळात अव्वल

TRUE NEWS MARATHI

डोंबिवली/प्रतिनिधी – हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त भगवा पंधरवडा म्हणून शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक रणजित जोशी आणि माजी नगरसेविका वृषाली रणजित जोशी यांनी ठाकूरवाडी येथील क्षितिज मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. याच शाळेतील एका विद्यार्थ्यांने देशपातळीवरील फूटबॉल स्पर्धेत शाळेचे नाव उंचविले होते.

क्षितिज संस्था संस्थापक अनिता दळवी, गौरी गोवेकर, लक्ष्मी रंगनाथन यांच्या अपार मेहनतीमुळे आज सुमारे साठ – सत्तर मतिमंद विद्यार्थ्यांना सूक्ष्म शालेय शिक्षणासह व्यवसाय प्रशिक्षण मिळत आहे. मुख्य म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळेला पूर्ण अनुदान मिळावे यासाठी संस्था, शिक्षक व कर्मचारी प्रयत्नात आहेत. शहरातील लोकप्रति व इतर लोकांकडून मिळत असलेला निधी अगदी अल्प प्रमाणात असून शाळा चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे यावेळी पदाधिकऱ्यांनी सांगितले.
क्षितिज मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांचे कौतुक करावे या भावनेतून माजी नगरसेविका वृषाली जोशी आणि नगरसेवक रणजित जोशी यांनी मतिमंद विद्यार्थ्यांना फळे वाटप केली. यावेळी शाखाप्रमुख वैशाली पेंडकर, उपशाखाप्रमुख अश्विनी आनंद, ज्योती आवटी, जान्हवी बापरडेकर यांच्यासह महिलावर्ग उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »