TRUE NEWS MARATHI.
डोंबिवली/प्रतिनिधी – आगासन गावातील खाजगी जागेवरील अन्यायकारक आरक्षण तात्काळ हटवण्यात यावे, रस्ते गावाबाहेरून घ्यावे यासाठी आगासनगाव संघर्ष समितीच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर आरक्षण हे हटवण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर गावकऱ्यांची संयुक्त बैठक लावून हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले. यावेळी आगासनगाव संघर्ष समितीतर्फे आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी आगासनगाव संघर्ष समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

