कल्याण ताज्या घडामोडी

फुटपाथवरील गटारावर झाकण लावण्यास पालिकेला विसर? संतप्त नागरिकांचा सवाल

TRUE NEWS MARATHI

डोंबिवली ( शंकर जाधव) – पायी चालण्याकरता राखीव असलेली जागा म्हणजे फुटपाथ. एकीकडे फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असतानाही पालिका प्रशासनाने कारवाई करून फुटपाथ नागरिकांना चालण्याकरता मोकळे केले. पालिकेचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त संजय कुमावत आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालय सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविले. या कारवाईत सातत्य असल्याने काही प्रमाणात यश आले आहे.

तर डोंबिवली पश्चिममेकडील स्टेशबाहेरील फुटपाथवर अतिक्रमण नाही. ‘ह’ प्रभाग क्षेत्र फेरीवाला अतिक्रमण हटाव विभागाचे पथकप्रमुख विजय भोईर व कर्मचारी यांनी अनेक वर्षापासून केलेल्या कामाची पोचपावती आहे. डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोडवरील व्यंकटेश दर्शन सोसायटीसमोरील फुटपाथचे काम सूरू असतानाही गटारावरील झाकण लावण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडल्याचे येथील नागरिक म्हणत आहे. या कामामुळे फुटपाथ वरून चालायची सोय नाही. एखादा नागरिक या गटारात पडून जखमी झाल्यास पालिका प्रशासन यांचे उत्तर देईल का असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »