ठाणे

डोंबिवलीत मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण वाढले,आरोग्य शिबिरात डॉक्टरांची माहिती

TRUE NEWS MARATHI.

डोंबिवली/शंकर जाधव – बदलती लाईफस्टाईल,आहारात बदल, ताणतणाव यामुळे माणसाच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. याचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत असून मधुमेह व रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहे. डोंबिवलीतहि आरोग्य शिबिरात असे रुग्ण येत त्यांची तपासणी केल्यानंतर दैनंदिन जीवनात पथ्य पाळावे व वेळेवर उपचार घ्यावेत असा सल्ला डॉक्टरांनी दिला.सोमवार 20 तारखेला
शिवसेना शाखा, महेश पाटील प्रतिष्ठान आणि प्लस अपलिफ्ट म्यूच्यूअल डेव्हलपमेंट ॲण्ड ॲड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगर्ली येथील महेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, ई.सी.जी., प्राथमिक आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन शिवसेना कल्याण तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनिता बा. पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे, संजय विचारे यांच्या हस्ते झाले.या शिबिरात सर्दी, ताप, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी समस्याग्रस्त रुग्णाची मोफत तपासणी करून रुग्णांना औषधे देण्यात आली. यावेळी संस्थेच्या डायरेक्टर डॉ. नंदिनी,  मुंबई रिजनल मॅनेजर वृषाली वेंगुर्लेकर, ओ.पी. डी. डॉ. रुपाली मेश्राम, कोर्डीनेटर - विवेक सोनवणे, आरोग्य सेविका - वृषाली काळे, डॉ. रूपाली, विवेक, संजू, उषा पंडित यांनी काम पाहिले.

या मोफत आरोग्य शिबिराचा फायदा विभागातील शेकडो नागरिकांनी घेतला. तपासणी दरम्यान काही रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन देण्यात आले. तर काहींना ई.सी.जी. व रक्त चाचणी करून देण्यात आली.यावेळी डॉ. रूपाली मेश्राम यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात शिबिरात मधुमेह रुग्ण आढलून आले. लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, फास्ट फूड आणि चुकीच्या जेवण पद्धतीमुळे आजार वाढत आहेत. ताणतणावामुळे उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळीच तपासणी करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी पुढे सांगितले.
शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी सांगितले की, विभागात अशा प्रकारचे शिबिर घेतले. कारण लोकांच्या घराजवळच आरोग्यतपासणी शिबिर असेल तर लोक येतात आणि आपल्या तब्येतीची तपासणी करून घेतात. शिबिरात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे अशी शिबिरे शक्य होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »