TRUE NEWS MARATHI.
डोंबिवली/प्रतिनिधी – शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या प्रकल्पांचे काम संथगतीने सुरु असल्याने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवली विधानसभा मतदार संघांचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवार 20 तारखेला मुंबईत आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत महापालिकेची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील पाणीटंचाई, फेरीवाले, अमृत, जलकुंभ उभारणी, स्व.शिवाजीशेठ शेलार मैदान, वेदपाठ शाळा, ठाकुर्लीच्या रहिवाश्यांसाठी प्रकल्प बधितांना पर्यायी घरांचे पत्र, विकास आदी विविध विषयांवर चर्चा झाली. त्या कामांना गती द्यावे असे या बैठकीत आमदार चव्हाण यांनी आयुक्तांना सुचवले.पालिका आयुक्तांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.
डोंबिवली पश्चिम येथील जलकुंभ उभारणीकरिता शासनाकडून निधी उपलब्ध आहे, परंतू पाईपलाईन शिप्टींगचे काम पूर्ण होण्यास अडीच महिने लागतील. त्या भागात पाणी वितरण व्यवस्थेचे संम्प पंपच्या भूखंडावरील असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात येईल. पूर्व व पश्चिम येथे अमृत योजनेतून शासनाकडून १६५ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. सिव्हरेज टँक बांधकाम पूर्ण करा. पूर्व पाथर्ली झोपडपट्टी येथे असलेल्या बीएसयूपी प्रकल्पामधल्या गाळयांमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी आमदार निधी देणार, जोशी विद्यालय ते पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार म्हासोबा चौक पर्यन्त करण्यासाठी भूसंपदानात येणाऱ्या विस्थापितांना पर्यांयी घरे देण्यासाठी वाटप पत्र देणे, भगवान काटे नगरच्या रहिवाश्यांना रेल्वेकडून निष्कासन प्रश्नावर त्यांच्या पुनर्वसनाचा कृति आराखडा करून मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेणार, खंबालपाडयातील स्व. शिवाजी शेलार मैदान विकासासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व आमदार रवींद्र चव्हाण यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार, शिवमंदिर रोड येथे सुसज्ज असलेली वैकुंठ स्मशानभूमि बांधकामासाठी ६ कोटी निधी मंजूर आहे. डोंबिवली पश्चिम सम्राट चौक ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन ते रामनगर परिसरात फेरीवाले नकोत, शहराला जोडणारा रिंग रुट रोडचे काम पूर्ण करणे, महापालिकेची टिळकनगरमध्ये महापालिका आरक्षित भूखंडावर अध्यात्मिक प्रशिक्षणाकरिता वेद पाठशाळा उभारणीसाठी दहा कोटींचा विकास आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठवणे, पूर्व-पश्चिम येथील झोपडपट्टी येथे दलित वस्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर गलिच्छ वस्ती सुधार योजनेतून तो आराखडा शासनाकडे पाठवणार. शहरातील तलाव कामांबाबतचा १५ कोटीमधून विकास गणेश नगर, जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट हे आराखडे करून शासनाकडे पाठवणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
पश्चिम येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) अंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामे व भारत सरकार यांच्याकडून भविष्यात प्राप्त होणाऱ्या निधी संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यासाठी निर्देशित करण्यात यावे, गणेश नगर येथील खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे,जुनी डोंबिवली खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे, कोपर गाव खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे आणि देवीचा पाडा खाडी किनारी गणेश विसर्जन घाट विकसित करणे यावरही चर्चा झाली.

