TRUE NEWS ONLINE
कल्याण – छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्राथमिक विभागाची विज्ञान प्रकल्प सादरीकरण स्पर्धेची अंतिम फेरी प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड या शाळेत घेतली .या अंतिम फेरीत संस्थेच्या 11 शाळेतील 60 विद्यार्थ्यांनी एकूण 30 प्रकल्प सादर केले. प्रकल्पासाठी पुढील विषय मुलांना देण्यात आले
1 अन्न आरोग्य आणि स्वच्छता
2 वाहतूक दळणवळण
3 सांडपाणी प्रक्रिया
4 नैसर्गिक शेती
5 आपत्ती व्यवस्थापन 6दैनंदिन जीवनातील विज्ञान ..वरील विषयावर शाळा पातळीवर प्रकल्प मांडणी व परीक्षण करून अंतिम फेरीत 30 प्रकल्प सादर केले शाळा पातळीवर या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून श्री नरेंद्र गोळे व श्री संजय देशपांडे हे लाभले होते. उद्घाटन सत्रासाठी पाहुण्यांसह संस्थेचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे एन ए पी समन्वयक सौ उर्मिला जाधव ,सर्व शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रकल्पाचे परीक्षण करून बक्षीस समारंभ करण्यात आला इयत्ता चौथीतून व तिसरीतून अनुक्रमे चार बक्षीस दिली. पाहुण्यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संस्थेचे कार्याध्यक्ष श्री तरटे सरांनी मुलांना घरी सोपे प्रयोग करण्यास सांगितले यानंतर बक्षीस वाटप होऊन राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योत्स्ना पाटील स्पर्धा प्रमुख यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या चिटणीस भारती वेदपाठक यांनी केले व पाहुण्यांचा परिचय व स्वागताचे काम प्राथमिक विद्यामंदिर टिटवाळा या शाळेच्या मुख्याध्यापिका दीक्षित यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गणेश सुतार यांनी केले संस्थेचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर झाला

