कल्याण ताज्या घडामोडी

क्रांतिपर्व कादंबरीला राज्यभर पोहचवू -डॉ. प्रा. प्रदिप ढवळ

TRUE NEWS ONLINE
कल्याण – कर्जत तालुक्यातील इतिहासाचे शिलेदार हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित क्रांतिपर्व या कादंबरीला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून राज्यभर पोहचवू अशी ग्वाही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदिप ढवळ यांनी गोवेली येथे दिली.
स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठान आणि कोकण मराठी साहित्य परिषद कल्याण ग्रामीण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोमाजी रामा पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आणि गिरीश कंटे लिखित पिपल्स पब्लिकेशन्स द्वारा क्रांतिपर्व या कादंबरीचे प्रकाशन डॉ.ढवळ यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,समाजातील उपेक्षित राहिलेल्या क्रांतिवीर,हुतात्मे यांना पुस्तक रूपाने जिवंत करण्याचे काम लेखक करीत असतात.त्यांच्या पाठीशी साहित्य आणि संस्कृती मंडळ उभे आहे.त्यांनी ते काम प्रामाणिकपणे करावे असेशी डॉ.ढवळ म्हणाले.
याप्रसंगी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी ग्रंथ भाष्य करताना सांगितले की, भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे,शासनाने दखल घेऊन त्यांच्या स्मृती जगविण्यासाठी सहकार्य केले तरच खऱ्या अर्थाने या वीरांना आदरांजली ठरेल.
स्वातंत्र्य सैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठानचे वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही समाजात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या बारा व्यक्तींना पुरस्काराने गौरवविण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र घोडविंदे होते तर व्यासपीठावर अनुसया बाई गोपाळ जामघरे,विठ्ठल हरी डामसे,सुभाष हरड,राजेश लाड,चित्रपट निर्माते दिग्दर्शक इलियास,सुधीर घागस,कल्पेश भोईर, दिपक घीगे,योगेश शेलार, शरद म्हात्रे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक घीगे यांनी केले तर सूत्रसंचालन राजकुमार कडव यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »