TRUE NEWS ONLINE
कल्याण – ऑल इंडिया केमिस्ट अॅण्ड इमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, गाजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी
म्हणजेच ७५ वा वाढदिवसा निमीत्त आप्पासाहेब अमृतपर्व नागरी सत्कार कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दिगग्ज नेत्यांच्या उपस्थित साजरा करण्यात येणार आहे. याकरिता कल्याण पूर्वेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती तयार करण्यात आली या समितीच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी रोड परिसरात पार पडला.
कार्यालयाच्या उद्घटनाला माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक सचिन पोटे, नीलेश शिंदे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे, माधुरी काळे, नरेंद्र सूर्यवंशी, अर्जुन नायर, सुभाष म्हस्के, विष्णु जाधव, संदीप तांबे, संदीप माने, उमाकांत चौधरी, रुपेश गायकवाड, विजय भोसले, मनोज नायर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
२९ जानेवारी रोजी संपूर्ण कल्याण करांच्या माध्यमातुन अप्पा शिंदे यांचा अमृतपर्व नागरी सत्कार केला जाणार आहे. याकरिता माजी केंद्रीय संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व काही मंत्री मंडळींसह आणखीन काही दिगग्ज नेत्यांची देखील उपस्थित लाभणार आहे.
या संपूर्ण सोहळ्याकरिता समिती नेमण्यात आली असून कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या समितीचे अध्यक्ष तर कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. तसेच या समितीत निलेश शिंदे, प्रशांत काळे, सचिन पोटे, नाना सूर्यवंशी, रमेश जाधव, हर्षवर्धन पालांडे, संजय मोरे यांसह कल्याण पूर्वेतील अनेक सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान असणार आहे. यात प्रामुख्याने २१ पदाधिकाऱ्यांची मुख्य नियोजन समिती असून १०१ पदाधिकारी संयोजन समितीवर असणार आहेत. त्यामुळे पार पडत असणाऱ्या या भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळ्याला कल्याण पूर्वेतील तमाम जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी समितीच्या वतीने प्रशांत काळे यांनी नागरिकांना केले आहे.
कल्याण
मुख्य बातम्या
जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कल्याणात नागरी सत्कार
- January 15, 2025
- by true news
- 0 Comments
- 77 Views

