खेळ

जय मल्हार शालेय विद्यार्थी सामाजिक संस्थेच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धा,१३०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

TRUE NEWS ONLINE
कल्याण – जय मल्हार शालेय विद्यार्थी सामाजिक संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत डोंबिवलीतील विविध शाळेतली विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेत अंदाजे १२०० ते १३०० मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेला सकाळी सात वाजता एमएमसीबी पासून सुरुवात झाली.माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला.ही स्पर्धा एकूण आठ गटात विभागणी केली होती पहिली ते चौथी एक किलोमीटर हा गट मुला मुलींचा होता ५ वी ते ६ वी मुलांचा ३ किमी व मुलींचा २ कि.मी ,७ वी व ८ वी मुलांचा ४ किलोमीटर व मुलींचा ३ किलोमीटर आणि नववी दहावी मुलांचा पाच किलोमीटर मुलींचा ४ किलोमीटर अशा एकूण आठ गटात विभागणी केली होती त्या प्रसंगी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व कल्याण जिल्हा शिवसेनाप्रमुख महेश बाबुराव पाटील व शिवसेना महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, भाजपा कल्याण तालुका सरचिटणीस नंदकिशोर परब, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, सचिव राजेश जयस्वाल, माजी सचिव वैभव तुपे, संस्थेचे खजिनदार लक्ष्मण फडतरे, कार्याध्यक्ष दीपक वारंग, उपाध्यक्ष बाळू घरत, राजेंद्र धारवणे, सहखजिनदार राजेंद्र पाटील, सहसचिव अनिल शिंदे, अनंत लाड, कार्यालय प्रमुख काशीराम साळवी, सहकार्यअध्यक्ष तानाजी आहेर, संघटक राकेश मोरे, अनिल पाटील गोपाळ कोचरेकर विजय जाधव अंबिकेश्वर शेलार नुमान, राजा चक्रधर पठाडे, स्वप्नील वाळुंज व इतर कार्यकारी सदस्यांनी अथक मेहनत घेऊन घेतली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा बांगर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »