TRUE NEWS ONLINE.
कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने युवा सेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत नागरिकांसाठी आधारकार्ड सेवा सुरू करण्यात आली.
शुक्रवारी या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, सागर जेधे, दिनेश शिवलकर, कविता गावंड, शैलेश देशमुख, समीर कवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
यावेळी जितेन पाटील म्हणाले, आधारकार्ड कामासाठी जो शासकीय दर ठरवून देण्यात आला आहे तेवढाच दर येथे घेतला जाईल. चांगल्यात चांगली सुविधा आपण येथे उपलब्ध करून दिली आहे. या कार्यालयात दरोरोज सुमारे ५० लोकांना सेवा मिळेल. काही ठिकाणी केवळ २०-२५ लोकांची कामे होतात पण या कार्यालयात जास्त लोकांना फायदा मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोकांना बसण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

