TRUE NEWS ONLINE
कल्याण – डोंबिवली शहरातील सिमेंटच्या जंगलात एकमेव प्रशस्त असलेल्या पालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलनाची अवस्था दयनीय झाली असून पालिका प्रशासनाच्या उद्यान विभागा कडून मैदानाची थातुर मातुर दुरुस्ती केली जात असल्याने खेळाडूंना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मैदानाच्या दुरवस्था मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आयोजित केलेली शालेय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली असल्याने पालिकेच्या सावळा गोंधळा बाबत शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर यांनी निषेध व्यक्त करीत त्वरित सुस्थितीत मैदान करावे अशी मागणी केली व पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले .
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल हे शहरातील खेळाडूसाठी खेळण्यासाठी प्रशस्त असे एकमेव मैदान आहे सदरचे मैदान खेळा व्यातिरिक खाजगी सांस्कृतिक महोत्सव ,लग्न समारंभ,खाजगी राजकीय पक्षाचे कार्यकामाला देऊ नये असा महापालिकेच्या सभागृहात ठराव करण्यात आला असताना मात्र या ठरावाची पायमल्ली करीत राजरोसपने अश्या कार्यक्रमांना राजकीय दबावा मुळे प्रशासन देत असते.या कार्यक्रमा मुळे क्रीडा संकुलनातील मैदानाची दुरावस्था होत असल्याचे त्यांना सोयर सुतकही नसते पालिका प्रशासनाच्या उद्यान विभाग ही या दुरावस्था
झालेल्या मैदानाची थातुर मातुर डागडुजी करून आपले
हाथ झटकून मोकळे होत असतात .
डोंबिवलीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत सावळाराम क्रीडा संकुलनात आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु महापालिकेचे हे मैदान स्पर्धा घेण्याचे सोडाच पण मुलांना खेळण्याच्या योग्यतेचे नसल्याचे दिसून आले आहे. दुरावस्था झालेल्या या मैदानामुळे स्पर्धे दरम्यान मुलांना गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. महापालिका प्रशासन या मैदानाची डागडुजी करण्याचा फक्त देखावा करीत आहे ही अतिशय खेदाची बाब असल्याची खंत शिवसेना उध्दव बळा साहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक यांनी व्यक्त केली.मुळातच ह्या शहरात मोजकीच खेळण्या योग्य मैदाने उपलब्ध आहेत. त्यातली बहुतांश मैदाने उत्सव, लग्ने, जत्रा अशा कार्यक्रमासाठी प्रधान्याने दिली जातात. असे कार्यक्रम पार पडल्यानंतर मैदानाची योग्य ती देखभाल केली जात नाही.क्रीडा संकुल आणि त्याच्या लगतचे मैदान हे फक्त खेळासाठी वापरले जावे याचे किमान गांभीर्य महापालिकेला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले. महापलिकेच्या या भोंगळ कारभारामुळे आम्हाला ही स्पर्धा पुढे ढकलावी लागत असल्यास बाबत याचा तीव्र निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगितले. वैशाली दरेकर यांनी या गंभीर प्रश्ना बाबत पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन द्वारे त्वरित मैदानाची डागडुजी करून सुस्थितीत करावे अशी मागणी केली .मैदान सुस्थितीत व खेळाच्या स्पर्धा घेण्यात जोगे झाल्यास पुढे ढकललेल्या आणते शालेय स्पर्धां येत्या काही दिवसात पुन्हा घेता येतील असे वैशाली दरेकर यांनी सांगितले

