कल्याण मुख्य बातम्या

रिजन्सी अनंतम गृहसंकुलत साडेचार हजार कुटुंबांना मिळणार घरगुती महानगर गॅस जोडणी

True news marathi online

कल्याण– खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची यशस्वी मध्यस्थीमुळे रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील ४५०० कुटुंबांना घरगुती महानगर गॅस जोडणी उपलब्ध करून मिळणार आहे.
रिजन्सी अनंतम हे डोंबिवलीतील सर्वात मोठे व आधुनिक सोयी सुविधा युक्त असे गृह संकुल जवळच्या एमआयडीसी निवासी विभागात घरगुती महानगर गॅसचा पुरवठा गेले पाच सहा वर्षे अगोदरपासूनच होत आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या प्रयत्नांमुळेच डोंबिवलीच्या घरा घरात महानगर गॅस पोहचला आहे. संपूर्ण डोंबिवली पूर्व येथे जवळ जवळ ८०% घरांना घरगुती गॅस जोडणीने जोडले गेले आहे. डोंबिवली पश्चिम साठीची रेल्वे क्रॉसिंग जोडणी पूर्णत्वास आली असून लवकरच घरा घरात जोडणीला प्रारंभ होणार आहे.
परंतु गेले अनेक वर्षापासून ह्या संकुलाला मात्र रिजन्सी अनंतमचे बिल्डर आणि महानगर गॅस ली ह्यांच्यात महानगर गॅस पुरवठ्याची लाइन टाकण्या बाबत काही वाद होता, त्यामुळे रिजन्सी अनंतम मधील कुटुंबियांना गॅस जोडणी साठी विलंब लागत होता. त्या बाबत नुकतीच काही रहिवाश्यांनी तक्रारीतून थेट कैफियत खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्याकडे मांडली. यानंतर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्वरित महानगर गॅस लि चे संबंधित अधिकारी यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून बैठक घेतली व रिजन्सी अनंतम बिल्डर ना संपर्क करुन लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत कळविले. त्या नुसार मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस महानगर गॅस लि. चे अधिकारी, रिजन्सी ग्रुप चे अधिकारी आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत शिवसेना उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, उप तालुका प्रमुख राहुल गणपुले आणि खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल देशमुख यांच्यात बैठक पार पडली. बुधवारी आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिजन्सी अनंतम बिल्डर ह्यांच्या मार्फत राहुल भटीजा यांनी महानगर गॅस लि. कंपनीला घरगुती गॅस जोडणी बाबतचा ना हरकत दाखला महानगर गॅस लि. चे डोंबिवली विभाग अधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.यावेळी रिजन्सी ग्रुप आणि महानगर गॅस अधिकारी यांच्यासह आमदार राजेश मोरे, राहुल गणपुले, सागर दुबे, रिजन्सी अनंतम मधील रहिवासी लता अरगडे, शरद साहू, विक्रम शर्मा आणि अनंतम सार्वजनिक कार्यक्रम समितीचे सभासद उपस्थित होते. सर्व उपस्थित रहिवाश्यांनी आमदार राजेश मोरे यांच्यामार्फत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »