True news marathi online.
भिवंडी – ठाणे जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायत क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल हर घर नल या योजना अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत परंतु या कामांची गती संथ असल्याने येत्या उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकताच भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायती हद्दीत सुरू असलेल्या कामांना अचानक भेटी देऊन या कामांचा आढावा घेतला आहे.

