ताज्या घडामोडी

HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्व. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा खा.सुरेश म्हात्रेंनी घेतला आढावा

True news marathi online.

भिवंडी – कोरोना नंतर चीन मधून पुन्हा एकदा नव्या HMPV या संसर्गजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. भिवंडी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच बेड राखीव असलेले विशेष कक्ष बनवण्यात आले आहे. यासोबतच सर्व अधिकारी कर्मचारी यांना उपायोजना करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून श्वसन आजाराची दैनिक नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी दिली आहे. हा व्हायरस कोव्हीड सारखा जीवघेणा नसला तरी संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

ह्युमन मेटा न्युमो व्हायरस असे नाव असलेला हा व्हायरस आर एस व्ही प्रकारात मोडतो. हा व्हायरस नागरिकांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीच्या आधारे शरीरात 5 ते 9 दिवसांपर्यंत राहू शकतो अशी माहिती डॉ माधवी पंदारे यांनी दिली. HMPV हा व्हायरस कोव्हिड सारखा नवा नसून याची यापूर्वी 2001 मध्ये नेदरलँड्च्या मेडिकल जनरल मध्ये याची नोंद आढळून अली आहे. या साठी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे असे डॉ. माधवी पंदारे यांनी स्पष्ट केले.
HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजनाची माहिती घेतली. बाळ्या मामा यांनी रुग्णालयाकडून केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शासनाकडून अधिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »