TRUE NEWS ONLINE
कल्याण -मराठी भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवणे ही तर काळाची गरज आहे. म्हणूनच सध्या सर्वत्र मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातोय. यानिमित्ताने मराठी भाषा, साहित्य, संगीत, खाद्य, बोलीभाषा, पेहराव अशा विविध अंगांना स्पर्श करून जाणारा मेघा विश्वास निर्मित “My बोली साजिरी… मराठी मनाचा Canvas!” या अभिवाचनात्मक संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन कल्याणच्या पंडितवाडी सभागृहात रविवारी १९ जानेवारीला करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सुप्रसिध्द वृत्त निवेदक अमेय रानडे, निवेदिका तपस्या नेवे, समीर सुमन, डॉ. मेघा विश्वास यांनी अभिवाचन केले. गायक वरून देवरे याच्या मर्मबंधातली ठेव या नाट्यगीताला तर अमित दांडेकर यांनी गायलेल्या जीवाशिवाची बैल जोड या गाण्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोलकीवर शशांक पडवळ आणि साईड रिदमवर रुपेश गांधी साथ केली. कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला

