भिवंडी/ प्रतिनिधी – कोनगाव पोलिसांची धडक कारवाई लाखोंची वनजीवप्राण्याचे कातडे व नखे चार आरोपीकडून हस्तगत केले आहे मोठ्या शिताफीने चार जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे यांची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली .पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव पोलिसांच्या पथकाला काही जण वाघांची कातडी व नखांची विक्री व तस्करी करण्यासाठी मुंबई नाशिक महामार्ग वरील
बासरी हॉटेल ठाकूर पाडा येथे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांच्या माहिती व मार्गदर्शनात वनविभागाचे कर्मचारी व युद्ध बचाव फाउंडेशनचे वन्यजीव चिकित्सक सुहास पवार आणि योगेश कांबळे यांच्यासह निरीक्षक गणपतराव पिंगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील आणि त्यांच्या पथकाने बासरी हॉटेल प्रशांत सुशील कुमार सिंग (वय २१), चेतन मांजे गौडा (वय २१) यांना रोखले.आर्यन मिलिंद कदम (वय २५ ) सर्व रा. वडाळा मुंबई आणि अनिकेत अच्युत कदम (वय २४) रा. सायन कोळीवाडा या दोघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाई दरम्यान अतिरिक्त पोलिस आयुक्त अनिल कुंभारे, पोलिस उपायुक्त भिवंडी योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत ढोले आणि कोन गाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपतराव पिंगळे, पोलिस निरीक्षक (गुंठे) राजेंद्र पवार पाटील, पोलिस उपनिरीक्षक पराग भट, सहायक पोलिस उपनिरीक्षक वामन सूर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल राजेश शिंदे, संतोष मोरे, पोलिस नाईक विनायक मासरे, संतोष पवार, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश पाटील, अशोक ढवळे, कृष्णा महाले आणि गणेश चोरगे इत्यादी कारवाई करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे .

