ताज्या घडामोडी शिक्षण

केडीएमसी शाळेतील विदयार्थ्यांनी घेतला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा लाभ

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा व मराठी आणि हिंदी माध्यमाच्या हिंदी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता ८ वी ते १० वी च्या एकूण २१० विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉल मध्ये करण्यात आले होते.

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, स्पर्धा परीक्षांबद्दल आकर्षण निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी काय करावे व परीक्षेची कशी तयारी करावी ? याचे ज्ञान मिळावे या दृष्टीकोनातून सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन तिमिराकडून तेजाकडे या संस्थेमार्फत करण्यात आले होते.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडेकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमा शुल्क विभाग ‘ भारत सरकार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत हसत खेळत व आनंदमयी वातावरणात मोलाचे सविस्तर मार्गदर्शन केले .
या प्रसंगी महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, विस्तार अधिकारी लक्ष्मण जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बिना सिंह व संबंधित शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शंका दूर करून घेतल्या तसेच मुलींनी व शिक्षकांनी स्पर्धा परीक्षेबाबत स्वमत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेतीवली येथील माध्यमिक शिक्षक संतोष पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिलीप चेडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »