लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याण स्थानकात आर.पी.एफ. जवानाने वाचवले महिलेचे प्राण

प्रतिनिधी.

कल्याण – रेल्वे स्थानकात आज सकाळी नऊ वाजता उद्यान एक्सप्रेस फलाटावर आली. त्याच वेळी एक प्रवासी महिला सोनी गोवंडा गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असताना गाडी सुटण्या आधीच ती गाडी आणि फलाट याच्यामध्ये सापडली. रेल्वे स्थानकावर उभे असलेले आरपीएफ जवान विजय सोळंकी यांनी ही घटना पाहताच तात्काळ प्रवासी महिलेच्या दिशेने धाव घेत तिला फलाट आणि गाडीच्या मधून बाहेर काढले. तिचे प्राण वाचवले . या घटनेमध्ये प्रवासी महिला बचावली आहे. तसेच आरपीएफ जवानाचे कौतुक केले जात आहे.

Translate »