लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

भिवंडीत रिव्हाँल्वर व जिवंत काडतुसे हस्तगत ,दोघा जणांना अटक

प्रतिनिधी.

भिवंडी – भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात अग्निशस्त्र (  रिव्हाँल्वर ) सारखे प्राणघातक शस्त्राची देवाणघेवाण करण्यासाठी काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची खबर निजामपूर पोलीसांना मिळताच  सापळा रचून दोघा तरूणांना देशी बनावटी रिव्हाँल्वर काडतूसा सह ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्या कडून सुमारे 35 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मो.हनिफ नईमुद्दीन शेख ( वय 28 रा.नदीनाका ) व सैफ एजाज मोमीन ( वय 24 म्हाडा कॉलनी भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिवंडी नाशिक महामार्गावरील मिल्लत नगर अल नूर गर्ल्स हायस्कुल समोरील रस्त्यावर प्राणघातक शस्त्रांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती  पोलीसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दोन इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जात असताना त्यांना पकडून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम660 रूपये असा ऐकून 35 हजार 960 रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपास वपोनि विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भूमेश साळुंके करीत आहेत.

Translate »