नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – विद्यार्थ्यांमध्ये सेवा भाव जागरूक व्हावा. भविष्यात त्यांनी देश सेवेचा विचार करावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन शिक्षणात समावेश झालेला अभ्यासक्रम आहे. स्वेच्छेने विद्यार्थी यात सहभागी होवून उत्तम कामगिरी करतानादिसतात. त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी वेगवेगळ्या स्तरावर त्यांना पुरस्कार दिले जातात. असेच पुरस्कार नुकतेच दिल्ली येथे दिले गेले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात 2021-2022 साठीचे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले. यावेळी महाराष्ट्रातील डॉ पवन रमेश नाईक, जान्हवी विजय पेड्डीवार, वेदांत सुदाम डीके यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे हे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पुरस्कार, एनएसएस स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी, एनएसएस युनिट्स आणि विद्यापीठे/अधिक दोन परिषदांना त्यांच्या स्वयंसेवी सेवा योगदानासाठी दरवर्षी प्रदान केले जातात.

