ताज्या घडामोडी शिक्षण

मुलुंडमधील विपीएमच्या बी आर टोल इंग्लिश शाळेतील कार्नीव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी टिम.

मुंबई/प्रतिनिधी– मुलुंडमधील विपीएमच्या बी आर टोल इंग्लिश शाळेतील कार्नीव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागासाठी या कार्नीव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्नीव्हलमध्ये दिवाळी सजावटीचे साहित्य, विविध प्रकारचे गेम्स आणि वेगवेगळे फूड स्टॉल उभारण्यात आले होते. ज्यामध्ये पालक आणि त्यांच्या मुलांनी आनंदाने सहभागी होत हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यास मदत झाली. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये कमवा आणि शिका ही संकल्पना रुजवण्यासाठी आणि प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळण्यासाठी मोठी मदत झाली. या कार्नीव्हलमध्ये तब्बल 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 57 स्टॉल लावले होते.

तर वि पी एम शाळेचे व्यवस्थापन आणि विश्वस्त यांच्या परवानगीने शाळेच्या प्राचार्या अजिता नायर आणि इतर शिक्षक वर्गाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल उपस्थित मुलांच्या पालकांनी शाळेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »