प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी फेज -१ मधील शक्ती प्रोसेस कंपनीला शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागली.आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नसून कंपनी बंद असल्याने कंपनीत मेंटन्सचे काम सुरू होते. घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे डोंबिवली शहर बुडाखाली आग धगधगत आहे त्यामुळे नेहमीच अग्नी तांडवाच्या भीतीच्या छायेत असते काही दिवसापूर्वीच भंगार गोडाऊन भीषण आग लागली होती. ही घटना ताजी असतांना पुन्हा कंपनीत आग डोंब उसळला. त्या भागात सगळी कडे आगेचे साम्राज्य निर्माण झाले होते.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि एमआयडीसी च्या अग्निशमन गाड्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे , कंपनी चे नाव शक्ती प्रोसेस असून ही कंपनी सुमारे ४० वर्ष जुनी आहे. आगीचे कारण आध्याप स्पष्ट झाले नाही. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे

