लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डोंबिवली कोळेगावातील हृदयद्रावक घटना, आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी खदाणीत बुडाली

प्रतिनिधी.

डोंबिवली -डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात दुपारच्या सुमारास गीता शेट्टी आपल्या चार वर्षाची मुलगी परी व सोळा वर्षाची मुलगी लावण्या हिच्यासह कपडे धुण्यासाठी घराजवळ असलेल्या खदानीत आई गीता कपडे धुत असताना तिची चार वर्षाची मुलगी परी याच ठिकाणी खेळत होती खेळता खेळता परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. मुलगी बुडत असल्याचे पाहून गीता यानी पाण्यात उडी घेतली मात्र गीता यांना देखील पोहता येत नव्हते .आई व बहीण  पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरलेल्या लावण्याने दोघीना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली लावण्याला देखील पोहता येत नव्हते मात्र मोठ्या धाडसाने आई सह आपल्या लहान बहिणीचे जीव वाचवला मात्र तिलाही पोहता येत नसल्याने ती पाण्यात बुडाली .या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत तातडीने लावण्याची शोधकार्य सुरू केले मात्र रात्र झाल्याने हे शोध कार्य थांबवण्यात आले .दरम्यान आपल्या मुलीच्या जाण्याने शेट्टी कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Translate »