डोंबिवली/प्रतिनिधी -कोरोनाने संपूर्ण जगत थैमान घातले आहे प्रत्येक जन आप आपल्या परिने कोरोनाशी दोन हात करीत आहे कोविड योध्दा कोरोनाशी मुकबला करीत आहेत.डॉक्टर,नर्से ,सफाई कर्मचारी ,पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाशी लढत आहे. दुसऱ्या लाटेत तर कोरोनाने खूप उग्र रूप धारण केले आहे. त्यातच काही नाशिक, विरार भांडूप, या सारख्या दुर्घटना घडल्या आहे.खूप विदारक चित्र तयार झाले आहे. रुग्णांना बेड नाही, त्याच प्रमाणे ऑक्सिजनचा हि खूप तुटवडा जाणवत आहे . या सर्व घडामोडी डोंबिवलीतील चित्रकलेचे शिक्षक अमोल पाटील यांनी आपल्या चित्रकलेच्या सहाय्याने रेखाटल्या आहेत.
डोंबिवलीच्या अमोल पाटील यांनी लॉकडाऊन लागल्यापासून कोरोना काळाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न करुन कोरोनाचे भयाण वास्तव चित्रतून मांडले आहे.
नाशिक येथे नुकतीच ऑक्सीजन गळतीची घटना घडली. त्यावर त्यांनी चित्र काढले आहे. त्यात ऑक्सीजनचा तुटवडा, ऑक्सीजन रेल्वे एक्सप्रेसने मागविली जातोय. बेडची कमतरता आहे. अनेकांचे जीव जात आहे. हे चित्र त्यांनी रेखाटले आहे. कल्याणच्या के. सी. गांधी शाळेत शिक्षणक असलेल्या पाटील यानी गतवर्षी लॉकडाऊन लागल्यापासून आत्तार्पयत चित्रकलेच्या माध्यमातून कोरोना वास्तव रेखाटले आहे. कोरोना काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे चित्र काढले आहे. परप्रांतीय मजूर चालत त्यांच्या गावी जात आहेत. जगातील विविध देशातील लॉकडाऊन चित्राच्या माध्यमातून दाखवित असताना मंदीर, मशीद, गुरुद्वारे, चर्च सगळेच काही बंद आहेत.एक प्रकारे कोरोनाचे भीषण रूप पाटील यांनी चित्रच्या माध्यमातून रेखाटले आहे.

